loader
Breaking News
Breaking News
Foto

विर्डी येथे काजू बागेत युवकाचा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला मृतदेह

दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या विर्डी गावातील विवाहित युवक विदेश लाडू गवस याचा मृतदेह काजूच्या बागेत गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला आहे यामुळे खळबळ उडाली आहे. सदर युवकाने गळफास लावला की घातपात अशी चर्चा सुरू झाली आहे. घटनास्थळी फास लावला तर त्याचे चप्पल पायात होते. हात झाडाच्या फांद्यांच्या वर ठेवलेले होते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करावी असे काही जणांचे म्हणणे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळवारी सकाळी सोशल मिडियावर एक मेसेज फिरत होता विर्डी गावात काजू बागेत एक मृतदेह आढळून आला. या नंतर मंगळवारी सायंकाळी दोडामार्ग पोलिस घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. सदर युवक हा कामावर जातो असे सांगून बाहेर पडला होता. मृतदेह बाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. हा मृतदेह नेमका कुणाचा? काजू बागेत कसा आला? झाड आहे ते पाहता फास लागू शकत नाही, जर फास लावला तर धडपड होते. पण खाली काही दिसत नाही, चप्पल पायात तशीच होती. तर त्याचे हात दोन फांद्याच्या वर ठेवलेले, यामुळे लोकांत घातपात तर नाही अशी चर्चा होती.

टाइम्स स्पेशल

दरम्यान दोडामार्ग पोलिस घटनास्थळी पंचनामा करून काही जणांचे जबाब घेऊन मृतदेह घेऊन दोडामार्ग रुग्णालय येथे दाखल झाले. मृतदेह आढळून त्या ठिकाणी एकंदर परिस्थिती संशयास्पद आहे. तेव्हा पोलिसांनी योग्य तपास करावा अशी मागणी केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg