मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला (EOW) विनोदी कलाकार कुणाल कामरा विरुद्ध तक्रार प्राप्त झाली आहे, ज्यामध्ये त्याच्यावर व्हिडिओंद्वारे विदेशी निधी मिळवल्याचा आरोप आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील कथीत टिप्पणीबद्दल कामरा याच्यावर आगोदरच अनेक गुन्हे दाखल आहेत.
मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा (Economic Offences Wing) स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याची चौकशी करण्याची शक्यता आहे. शिवसेना नेत्यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. ज्याची पुष्टी EOW ने केली आहे. कार्यक्रम व्हिडिओ बनविण्यासाठी स्टँड-अप कॉमेडियन जगभरातून आर्थिक पूरवठा केला जातो. त्याला कोणाकडून निधी मिळतो, त्याला मिळणाऱ्या विदेशी निधीचीही चौकशी केली जावी, अशी मागणी शिवसेना नेत्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.
टाइम्स स्पेशल
मुंबई पोलीस आता काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता आहे. एका स्टँड-अप कॉमेडी कार्यक्रमात कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथीतरित्या अवमानकारक शब्द वापरले. कॉमेडीयनने त्यांच्याबद्दल 'गद्दार' अशा शब्दप्रयोग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान, या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर वाद निर्माण झाला. काही आक्रमक शिंदे समर्थकांनी जिथे हा कार्यक्रम पार पडला त्या स्टुडीओचीही तोडफोड केली. ज्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.