loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडीला अवकाळी पावसाने झोडपले, शेतकरी चिंतेत

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्याला दुसर्‍या दिवशीही पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने सर्वांची एकच तारांबळ उडाली. वैभववाडी शहरात बुधवार आठवडा बाजाराला आलेल्या ग्राहकांचीही त्रेधातिरपीट उडाली. या अवकाळी पावसाचा फटका शहरात फिरत्या विक्रेत्यांना चांगलाच बसला. विक्रेत्यांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळवारी पावसाने सायंकाळी हजेरी लावली. दुसर्‍या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा फटका नागरिकांना बसला. वैभववाडी ते करूळ दरम्यान महामार्ग रुंदीकरणाचे काम चालू आहे. या पावसाचा फटका या मार्गावरून प्रवास करणार्‍या दुचाकी चालकांना बसला. रस्त्यात ठिकठिकाणी चिखलमाती साचली होती. चिखलात पडून अनेक दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात अनेक मोटरसायकल चालक जखमी झाले. पावसाने पुढील काही दिवस जोर असाच ठेवल्यास आंबा व काजू बागायतदार, शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg