loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळे-चाफवली परिसराला विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपले

देवळे (प्रकाश चाळके) : संगमेश्वर तालुक्यातील देवळे चाफवली परिसरात विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने चांगलच झोडपले. रात्रीची वेळ आणि लोक झोपेत असल्याने विजांच्या कडकडाटाने घाबरुन जागे झाले. पूर्ण दिवसभर कधी ऊन तरी ढगाळ वातावरण होत. त्यातच भयानक गर्मी, जीव कासावीस होत होता. उकाड्याने दिवसभर हैराण केले असे वातावरण तयार झाले होते. पाऊस हजेरी लावणार असा अंदाज होताच. मात्र कधी कधी तो वार्‍याने उडतोही असे जाणकार म्हणतात. मात्र आज या वेळी पावसाने हजेरी लावून अनेकांची तारांबळ उडवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काही ठिकाणी जनावरांची वैरण भिजली तर काही ठिकाणी घर बांधणीसाठी आणलेल सिमेंट. सर्वच ठिकाणी तारांबळ उडाली. सर्वात जास्त फटका बसला तो आंबा, काजू बागायतदारांना. आता कुठे पिक येत होते तो पर्यंत निसर्गाची अवकृपा झाली. हातातोंडाशी येणार पिकाचं फार मोठं नुकसान झाले आहे. देवळे, चाफवली, मेघी, दाभोळे, चोरवणे, करंजारी परिसरातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होऊन ते अडचणीत सापडले आहेत. मोठे नुकसान झाल्यास साफसफाई, खतांसाठी घेतलेली बँकांची कर्ज परत फेड कशी करावी या विवंचनेत शेतकरी वर्ग सापडला आहे. एकूणच अवकाळी पावसाने सर्वांचीच तारांबळ उडवली तर शेतकरी अडचणीत सापडला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg