loader
Breaking News
Breaking News
Foto

उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी मातीच्या माठाला प्राधान्य

संगलट (इक्बाल जमादार) - आधुनिक काळाप्रमाणे घरात नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे जुन्या वस्तू कालबाह्य होऊन, त्यांना ऍन्टिक पीसचे महत्त्व आले. पण या बदलात अजून थोडा तग धरून आहे, तो म्हणजे पाण्याचा माठ. अजून काही जण फ्रिजचे पाणी पिण्यापेक्षा माठाचे गार पाणी पिण्यास प्राधान्य देतात. गरीबांचा फ्रीज म्हणून ओळख असलेल्या मातीच्या माठांना वाढत्या उन्हामुळे चांगलीच मागणी वाढली आहे. त्यातच उन्हाच्या झळा वाढू लागल्याने थंडपेयाच्या सुद्धा मागणी वाढलेली दिसून येत आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी नागरिकांना पाणी पिण्यासाठी बॅरल ठेवण्यात आले आहेत. एकीकडे वाढती उन्हाच्या तीव्रतेमुळे अंगाची लाही लाही होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

‘माठ’ गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांकडे असे. माठाला काहीजण ’रांजण’ असेही म्हणतात. काळाप्रमाणे सगळ्या वस्तूंचे रंग बदलले, पण या मॅचिंगच्या दुनियेत माठाचा रंग मात्र अजून लाल राहिला आहे. राजस्थानी बनावटीचे मातीची भांडी सुद्धा विक्रीसाठी आली आहेत. काळ्या रंगाचे माठासह कलरफुल नक्षी केलेले माठ आकर्षण ठरत आहेत. बाजारात माठाच्या आकारानुसार १०० ते २०० रुपयांनी किंमत वाढल्याने उन्हाच्या तीव्रतेसह ग्राहकांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. उन्हाळा सुरू होताच माठाच्या मागणीत वाढ होते. लाल माती व काळ्या मातीपासून बनवण्यात आलेले माठ थंड पाण्यासाठी स्वस्त पर्याय मानले जातात. यंदा माठाच्या किंमतीत २० ते २५ टक्के वाढ झालेली दिसून येते. मातीच्या माठातील पाणी हे नैसर्गिकरीत्या थंड होते. फ्रीजच्या थंडगार पाण्याचा मानवी शरीरावर परिणाम होतो. सुरुवातीला माठाच्या पाण्याला एक प्रकारचा मातीचा वास यायचा, त्या पाण्याची चवही छान असे. उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी मातीच्या माठाला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg