खेड (वार्ताहर) : बुरंबी येथील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी- शिवने या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक सारथी परीक्षेत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य परिषद पुणे तर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी आयोजित या सारथी परीक्षेमध्ये इ.८ वी मधील विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. प्रशालेतील कु. रितेश विनोद गेल्ये, कु. पार्थ अविनाश होरंबे व राज नथुराम दोरकडे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले असून त्यांना इ. १२ वी पर्यंत महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथी योजनेंतर्गत दरवर्षी रु ९,६००/- इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश भानुदास विरकर यांनी माहिती देताना सारथी योजना भारत सरकार नवी दिल्ली यांचे शालेय शिक्षण विभागाकडून राबविली जात असून आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्याच्या प्रज्ञेची जोपासना तसेच त्याचे उच्च माध्यमिक इ.१२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती स्वरुपात आर्थिक मदत शासनाकडून दिली जाते, असे सांगितले. शिष्यवृत्तीपात्र यशस्वी विद्यार्थी तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे सहाय्यक शिक्षक निलम सचिन पवार, संदीप विष्णु नटे, संदिप जयवंत जाधव व स्वरुपा वैभव भोसले यांचे संस्थेच्यावतीने संस्था उपाध्यक्ष राजाराम सदाशिव गर्दे, शांताराम गंगाराम भुरवणे, सचिव शरद गोविंद बाईत, तसेच संचालक ललीतकुमार लोटणकर, दिनेश शामराव जाधव, सचिन मोहिते व शाळा पर्यवेक्षक महावीर साठे यांनी अभिनंदन केले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.