loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : लांजा शहरात रात्री १ वाजता विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. सुमारे तीन तास जोरदार पाऊस सुरु होता. पहाटेपर्यंत पावसाचे ठिबकणे चालूच होते. लांजा तालुक्यात बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस पडला असून आंबा आणि काजू पिकाला धोका निर्माण झाला आहे. गेले बरेच दिवस ढगाळ वातावरण होते. निसर्गामध्ये अवलक्षणिय बदल झाले आहेत. हवामान खात्याने पाऊस पडणार याचा अंदाज वर्तविलेला होता तो खरा ठरला. दिवसभर खूप उकाडा जाणवत होता. पाऊस पडल्याने काहीसा दिलासा मिळाला. नेहमीप्रमाणे महावितरणची वीज बंद होती, त्यामुळे नागरिक जागे झाले. या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदार यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg