loader
Breaking News
Breaking News
Foto

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात वेब आधारित कार्यशाळा संपन्न

वेळणेश्वर (वार्ताहर) : गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या वतीने "Mastering the Web: A Hands-On Development Workshop" या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून महाविद्यालयातील सन २०१८ बॅचचे माजी विद्यार्थी व स्टॅकलॅबचे सह-संस्थापक सुयश वाघाटे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना वेब डेव्हलपमेंटच्या मूलभूत संकल्पना, फ्रंटएंड आणि बॅकएंड तंत्रज्ञान, तसेच प्रत्यक्ष प्रोग्रॅमिंग व वेब प्रोजेक्ट तयार करण्याचा अनुभव देण्यात आला. श्री. वाघाटे यांनी विद्यार्थ्यांना वेब डेव्हलपमेंट क्षेत्रातील नवीन ट्रेंड्स आणि उद्योगात आवश्यक असलेल्या कौशल्यांविषयी सखोल मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचे व्यवस्थापन प्रा. राधिका कदम आणि प्रा. कृष्णा मालठणकर यांनी केले.

टाइम्स स्पेशल

हा संपूर्ण कार्यक्रम संगणक अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. केतन कुंडिया, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र सोनी, तसेच उपप्राचार्य प्रा. अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg