loader
Breaking News
Breaking News
Foto

राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचा वार्षिक ताळेबंद जाहीर

खेड (प्रतिनिधी) - राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेने आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपला वार्षिक ताळेबंद जाहीर करतानाच गतवर्षीपेक्षा यंदा थकबाकीदारांचे प्रमाण कमी झाले असल्याचे जाहीर केले आहे. तर पतसंस्थेला या आर्थिक वर्षात ४४ लाखांचा नफा झाला आहे. सन २०२४- २०२५ या आर्थिक वर्षाचा आर्थिक ताळेबंद ३१ मार्च रोजी राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेने जाहीर केला. त्यानुसार या आर्थिक वर्षाअखेर पतसंस्थेच्या ठेवी ३८ कोटी इतक्या असून कर्ज वाटप ३१ कोटी पर्यंत झाले आहे. पतसंस्थेने विविध क्षेत्रात केलेली गुंतवणूक ०९ कोटी ५७ लाख इतकी असून यंदा पतसंस्थेने ४४ लाख इतका नफा मिळवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासालाही उत्तम प्रतिसाद मिळतो तर ठेवीदारांचा सातत्याने पतसंस्थेवर असलेल्या विश्वासामुळेच यश मिळत आहे. संचालक मंडळाचा चालू आर्थिक वर्षी ५० कोटी ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मानस असून या आर्थिक वर्षात संस्थेच्या ग्राहक, सभासद व ठेवीदारांनी केलेल्या सहकार्याबद्दल पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. वैभव सदानंद खेडेकर, उपाध्यक्ष व संचालक यांनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसंत ब. पिंपळकर, व्यवस्थापक, शाखाधिकारी, वसुली अधिकारी, कर्मचारी वर्ग व पिग्मी एजंट यांचे आभार मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg