loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरतील श्री नर नारायण देवस्थानात रौप्य महोत्सवी कार्यक्रम

वरवेली गणेश किर्वे गुहागरातील वरचापाट येथील श्री नर नारायण देवस्थानात मंदिर जिर्णोद्धार रौप्य महोत्सव व ११८ वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्ताने मंगळवार दिनांक ८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १२ श्री विष्णू याग, दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्री १० वा. बुवा श्री विनोद चव्हाण यांचे सुश्राव्य भजन. बुधवार दि.९ एप्रिल रोजी रात्री ८ ते ११ वा.स्वरभाव सरिता सूरसखी पुणे प्रस्तुत मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुरुवार दि. १० रोजी सकाळी ५.३० वा.काकड आरती, सकाळी ८ वा. श्रींची पूजा व आरती, दुपारी १२.३० वा. ग्रंथ पारायण व भजनांचे लॉटरी पद्धतीने नंबर काढले जातील. सायं. ५.३० वाजता श्री पिंपळादेवी महिला मंडळाचे सूस्वर भजन, रात्री ७ वा. प. पु .गुरुदेवता कलावती आई मंडळाचे भजन, रात्री १० वा. सुश्राव्य संगीत भजने. शुक्रवारी दि.११ रोजी सायं. ४ वाजता श्री नर नारायण पालखी सोहळा, शनिवार दि. १२ रोजी सकाळी ६ वा. श्री हनुमान जन्म सोहळा, सायंकाळी ४ वा.श्री हनुमान पालखी सोहळा .रविवार दिनांक १३ रोजी १२.३० वा. महाप्रसाद. बुधवार दि. १६ रोजी रात्री १० वा. पिंपळादेवी महिला मंडळ निर्मित धमाल विनोदी एकांकिका 'गुड्डीच्या लग्नाला यायचं ह...' हे सर्व कार्यक्रम श्री नर नारायण मंदिर वरचापाट येथे होणार असून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मयुरेश किसन साखरकर व मंडळाने केले आहे.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg