loader
Breaking News
Breaking News
Foto

मांगेली येथून खडी वाहतूक करणारा डंपर पलटी, चालक जखमी; खाजगी पागाराचे नुकसान

दोडामार्ग, दि. ३ एप्रिल प्रतिनिधी गेल्या काही महिन्यापासून मांगेली कुसगेवाडी येथून सर्व नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा जास्त खडी भरून वाहतूक केली जात असताना दोडामार्ग तहसीलदार याकडे बघ्यांची भूमिका बजावून संबधिताना पाठीशी घालत आहेत. अशाच प्रकारे मांगेली येथून मोठ्या प्रमाणात डंपर मध्ये खडी भरून वाहतूक करणारा डंपर खोक्रल गावात एका उतारू वळणावर पलटी होऊन चालक जखमी झाला. शिवाय येथिल दत्ताराम गवस यांच्या पागाराचे नुकसान झाले. अपघात होताच घाईघाईने डंपर बाजूला करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मांगेली कुसगेवाडी येथील दगड खाणीत क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात खडी भरून हा डंपर गोवा हद्दीत असलेल्या खडी क्रशर या ठिकाणी जाण्यासाठी मांगेली दोडामार्ग कडे येत असताना खोक्रल गावात एका वळणावर खडी जास्त प्रमाणात भरली यामुळे डंपर रस्ता कडेला पलटी झाला. आणि खडी खाली कोसळली डंपर खडी मुळे येथील गवस यांच्या बांधकाम केलेल्या पागाराचे नुकसान झाले. नियमबाह्य पध्दतीने खडी वाहतूक प्रकरणी दोडामार्ग तहसीलदार कारवाई करू शकले नाही ,असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे .

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

ओव्हर लोड खडी वाहतूक कडे दोडामार्ग तहसीलदार यांचा कानाडोळा

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg