loader
Breaking News
Breaking News
Foto

जेष्ठ नागरिकांनी ऑनलाईन तसेच अनोळखी व्यक्तींपासून सावधानता बाळगावी- पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे

मालवण (प्रतिनिधी) :- देशात ऑनलाइन फसवणुकीला अनेक जण बळी पडत आहेत.यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक मोठया प्रमाणावर ऑनलाईन तसेच घरी आलेल्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने फसले जात आहेत. याशिवाय मोबाईल वरील फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम वर अश्लील फोटो व्हिडिओ पाठवून ज्येष्ठ नागरिकांना फसवले जात आहे. मोबाईलवर येणाऱ्या अश्लील फोटो नग्न व्हिडिओ, घरी येणाऱ्या अनोळखी व्यक्तींपासून पासून ज्येष्ठ नागरिकांनी सावध राहावे तसेच पैशाच्या इतर कोणत्याही अमिषाला बळी न पडता जास्तीत जास्त आपल्याला सुरक्षित कसे राहता येईल याची काळजी घेत सुखी समाधानी जीवन जगावे असे आवाहन मालवणचे पोलीस निरीक्षक कोल्हे यांनी येथे बोलताना केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ऑनलाइन फसवणुकीला अनेक जण बळी पडत असून त्यात जेष्ठ नागरिकांचा भरणा अधिक आहे जेष्ठ नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने मालवण पोलीस ठाणे यांच्या कार्यक्षेत्र येणाऱ्या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या संवाद बैठका घेऊन मालवण पोलीस निरीक्षक श्री प्रवीण कोल्हे यांच्याकडून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत चौके गावातील ज्येष्ठ नागरिकांची बैठक ग्रामदेवता श्री देवी भराडी मंदिर येथे पार पडली तसेच साळेल येथील ज्येष्ठ नागरिकांची बैठक ग्रामदैवत श्री देव मंदिर येथे घेण्यात आली.

टाइम्स स्पेशल

यावेळी मार्गदर्शन करताना श्री. कोल्हे यांनी समाजात ज्येष्ठ नागरिकांना कशाप्रकारे फसवण्यात येत आहे .काही ठिकाणी फसवण्यात आलेल्या घटनांचे वर्णन केले. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांनी मोबाईल वापरताना जास्त काळजी घ्यावी कारण सध्या ऑनलाईन फसवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत आहे यात ज्येष्ठ नागरिकांना अनेक प्रकारच्या येणाऱ्या कॉल वरून आपले बँक अकाउंट नंबर सांगून ओटीपी देत आहेत अशाने अनेकांच्या बँकांमध्ये असलेली रक्कम ऑनलाईन पद्धतीने काढली जाते. आणि ज्येष्ठ नागरिक निवृत्त झाल्यानंतर मिळणाऱ्या पेन्शनवर उदरनिर्वाह करतात. मात्र काही अनोळखी व्यक्तींकडून अशा लोकांची माहिती घेऊन फसवले जात आहे. त्यापासून सावध राहावे असे आवाहन केले.यावेळी पोलीस निरीक्षक कोल्हे यांचे जेष्ठ नागरिकांनी आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

चौके- साळेल येथील ज्येष्ठ नागरिकांशी साधला संवाद

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg