loader
Breaking News
Breaking News
Foto

शिरंगे येथील दगड खाणी पुढील आदेशापर्यंत बंद केल्याने यावर अवलंबून असलेल्या युवकावर उपासमारीची वेळ

दोडामार्ग, दि.३ एप्रिल प्रतिनिधी गेल्या काही वर्षापासून तिलारी धरणाच्या जलाशयाला लागून सुरू असलेल्या काळ्या दगड खाणींमुळे अनेक युवकांना रोजगार उपलब्ध झाला होता. अनेक कुटूंबाचा उदरनिर्वाह होत होता. आणखी दोन अडीच महिने सिझन होता या नंतर पावसाळ्यात दगड खाणी बंद झाल्या असत्या. पण दगड खाणींमुळे खानयाळे गावाला धोका निर्माण होऊ शकतो यासाठी शिरंगे येथील दगड खाणी बंद करा यासाठी खानयाळे गावातील ग्रामस्थ यांनी आठ दिवस उपोषण केल्यानंतर प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत खाणी बंद ठेवण्यात यावे असे जाहीर केले. यामुळे यावर अवलंबून असलेल्या युवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वाहनांचे हप्ते कसे फेडावे ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिरंगे या ठिकाणी पाच ते सहा काळ्या दगड खाणी सुरू होत्या या ठिकाणी अनेक युवकांनी आपले डंपर, जेसीबी मशिन, पोकलेन, इतर वाहने लावली होती. तर काही जणांनी मजूर कामगार देखील पुरवले होते. अनेक डंपर वर काही युवक डायव्हर म्हणून कामाला होते. यामुळे मिळणारा पगार यातून घरचे कुटुंब चालत होते. पण दगड खाणी जिल्हाधिकारी यांनी पुढील आदेशापर्यंत बंद ठेवावे असे फर्मान काढले आहे. गेल्या काही दिवसापासून शिंरगे दगड खाणी परिसरात शुकशुकाट दिसून येतो.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

दोडामार्ग तालुक्यात इतर उद्योग व्यवसाय नाही किंवा वाहने भाडे तत्वावर देण्यासाठी तशी कामे नाहीत. बऱ्याच युवकांनी बॅक कर्ज करून वाहने खरेदी केली. पण उद्योग बंद वाहने उभी यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg