loader
Breaking News
Breaking News
Foto

'गणेश प्रतिमांचे घिबली आर्ट हा देवतांचा अवमान'; मुंबईचा राजा मंडळची सोशल मीडियावरून बाप्पाचे एआय जनरेटेड फोटो काढून टाकण्याची विनंती

सध्या सोशल मीडियावर एक नवीन लाट उसळली आहे, ती म्हणजे ‘एआय घिबली आर्ट’ ही कला जपानच्या प्रसिद्ध स्टूडियो घिबलीच्या हाताने रेखाटलेल्या चित्रशैलीवर आधारित आहे. या फीचरमुळे लोक आपल्या फोटोंना घिबलीच्या दृश्यात बदलत आहेत. हा ट्रेंड इतका वाढला की, सेलिब्रिटींपासून ते नेत्यांपर्यंत आणि ब्रँड्सपर्यंत सर्वांनी यात भाग घेतला. मात्र सोशल मीडियावर या 'एआय घिबली आर्ट' ट्रेंडबाबत, मुंबईचा राजा मंडळानेनागरिकांना भगवान गणेश आणि इतर देवांच्या प्रतिमा असलेल्या पोस्ट काढून टाकण्याची विनंती केली आहे. ही विनंती मंडळाने बुधवारी शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये करण्यात आली. मंडळाने म्हटले आहे की, असे फोटो हे भगवान गणेशाचा अपमान आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत केलेल्या पोस्टमध्ये मंडळाने म्हटले आहे, ‘मुंबईच्या राजाच्या सर्व भक्तांना आदरपूर्वक आवाहन! आपणा सर्वांना ज्ञात आहे की, मुंबईचा राजा आणि इतर देवता आपल्या सर्वांच्या आस्थेचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहेत. देवतांच्या चित्रांमध्ये पवित्रता आणि पावित्र्य असते. सध्या, सोशल मीडियावर काही लोक बाप्पांच्या छायाचित्रांचे 'घिबली आर्ट' तयार करत आहेत, जे योग्य वाटत नाही.

टाइम्स स्पेशल

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg