loader
Breaking News
Breaking News
Foto

दाभोळ-दापोली एसटी बसचा अपघात, 7 जखमी

संगलट (इक्बाल जमादार) - दापोली आगारातील आज सकाळी 10. 45 वाजता सुटणारी दाभोळ-दापोली एसटी बसचा वलणे गावच्या हद्दीत एका उतारावर ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. चालकाच्या सावधगिरीमुळे चालकाने एसटी बस गटारामध्ये घालून प्रवाशांचे जीव वाचवले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एसटी बस क्रमांक एम एच 14 बी /टी 1488 असा आहे. यामध्ये सात प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्वरीत दापोली येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरच्या गाडीमध्ये एकूण 21 प्रवासी होते त्यामध्ये हरिश्चंद्र काष्टे वय वर्ष -72, तारामती काष्टे वय 68, रोशन मंगेश रोकडे वय 12, सायली मंगेश रोकडे वय 39, सुनंदा गोविंद रोकडे वय 70, हवाबी युसूफ बिजापूर वय 70, प्रेरणा सोलकर वय 20 या जखमी झाल्या आहेत या अपघाताबाबत दापोली पोलीस तपास करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg