मुंबई आणि मुंबई दरम्यान अंडरवॉटर रेल्वे लिंकचा एक अभूतपूर्व प्रस्ताव पुन्हा समोर आला आहे, ज्यामुळे दोन्ही शहरांमधील प्रवास वेळ फक्त दोन तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. यूएई-आधारित नॅशनल अॅडव्हायझर ब्युरो लिमिटेडने प्रथम सादर केलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारत आणि यूएई दरम्यान वाहतूक आणि व्यापार कनेक्टिव्हिटीमध्ये क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवतो. या प्रस्तावाची अंमलबजावणी झाली तर, अंडरवॉटर रेल्वे (Underwater Train) कॉरिडॉर हवाई प्रवासाचा पर्याय म्हणून काम करेल. ज्यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक दोन्ही सुलभ होतील. या उपक्रमामुळे द्विपक्षीय व्यापार वाढेल, विशेषतः कच्च्या तेलासारख्या आवश्यक वस्तूंच्या वाहतुकीमध्ये. दरम्यान, संभाव्य प्रकल्पातील अभियांत्रिकी गुंतागुंत आणि पायाभूत सुविधांच्या आवश्यकतांमुळे, प्रकल्पाला अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आवश्यक असल्याचा अंदाज आहे.
दुबई आणि मुंबई दरम्यान अंडरवॉटर रेल्वे प्रस्ताव अनेक वर्षांपूर्वीच मांडण्यात आला होता, परंतु त्याच्या मंजुरी किंवा विकासाबाबत कोणतेही अधिकृत अपडेट देण्यात आलेले नाहीत. मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडेच, नॅशनल अॅडव्हायझर ब्युरो लिमिटेडचे प्रतिनिधित्व करणारा एक YouTube अकाउंटने एक संकल्पनात्मक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये रेल्वे लिंक पूर्ण झाल्यावर कसे कार्य करेल हे दाखवले आहे. तथापि, तांत्रिक गुंतागुंतीमुळे, व्यवहार्यता, निधी आणि मंजुरी यावर चर्चा सुरूच आहे.
टाइम्स स्पेशल
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.