loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड एस. टी. बस स्थानकात दुर्गंधी; स्वच्छता गृहाच्या साफसफाईचा विसर?---

दापोली(शशिकांत राऊत) - मंडणगड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एस. टी .बस स्थानकाच्या आवारातील स्वच्छतागृहातील अस्वच्छतेमुळे सगळीकडे दुर्गंधी पसरली आहे. स्वच्छता गृहाच्या बाहेर स्वच्छता गृहातील मलमुत्र इतस्ततः टाकी बाहेर येण्या जाण्याच्या मार्गावर साठून राहत असल्याने एस. टी. बस स्टॅण्डच्या आवारात तसेच आजुबाजूच्या रहिवासी भागात पसरणा-या दुर्गंधीने प्रवाशांसह शहरातील नागरीकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र तरीही मंडणगड एस. टी. आगार प्रशासन स्वच्छता करण्यासाठी अजिबात का लक्ष देत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंडणगड शहरात एकमेव असलेल्या या स्वच्छता गृहाचा आपल्या लघू शंकांसाठीचा वापर प्रवासी वर्गासह शहरात कामानिमित्त आलेले लोक तसेच शहरातील बहुतांश लहान मोठे विक्रेते करत असतात अशा या स्वच्छता गृहात तसेच स्वच्छता गृहाच्या बाहेर असलेल्या अस्वच्छतेच्या दुर्गंधींचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो आहे. मंडणगड शहरातील स्वच्छता गृहाच्या बाहेरील दुर्गंधीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे साथजन्य रोगाच्या प्रादुर्भावाचा प्रसार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.असे असताना देखील एस.टी.प्रशासन प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची समस्या सोडविण्यासाठी लक्ष का देत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg