loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांच्या अपुर्‍या व्यवस्थेबाबत सुधारणा करा - शिवसेना पदाधिकार्‍यांचे निवेदन---

दोडामार्ग(प्रतिनिधी)- साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपत्कालीन रुग्णांच्या उपचारामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. रुग्णालयातील काही अपुर्‍या सुविधांमुळे गंभीर परिस्थितीत रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळत नाहीत. परिणामी काही वेळा रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होतो. तेव्हा या ठिकाणी येणार्‍या रुग्णांवर योग्य उपचार झाले पाहिजे जीव वाचला पाहिजे यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करावी असे निवेदन शिवसेना उपविभाग प्रमुख (उबाठा) राजन गावडे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांना दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईसीजी मशीनद्वारे तपासणीसाठी लागणारा अधिक वेळ हा एक गंभीर प्रश्न ठरत आहे वेळेवर तपासणी न झाल्याने काही रुग्णाची प्रकृती अधिक बिघडते आणि दुर्दैवाने काही वेळा त्यांचा मृत्यूसुद्धा होतो. या स्थितीला रोखण्यासाठी अत्याधुनिक आणि जलद ईसीजी मशीनची त्वरित उपलब्धता करणे अत्यावश्यक आहे. तसेच, हृदयविकाराशी संबंधित रुग्णांसाठी प्राथमिक उपचार म्हणून आवश्यक औषधांची उपलब्धता करावी जेणेकरून रुग्णांना तत्काळ आराम मिळू शकेल आणि अधिक काळजीपूर्वक पुढील उपचारासाठी वेळ मिळेल तसेच, सर्पदंश झालेल्या रुग्णांवरही योग्य वेळी उपचार होणे अपेक्षित आहे. रुग्णांना प्राथमिक उपचारांनतर पुढील उपचारांसाठी दोडामार्ग, म्हापसा, किंवा बांबोळी येथे जाण्यास सांगितले जाते, ज्यामुळे वेळेचा अपव्यय होतो आणि रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो. या परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य औषधे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी कायमस्वरूपी उपस्थित ठेवावेत. अशी मागणी करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg