loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे अभूतपूर्व स्वागत---

खेड - (प्रतिनिधी )- गुरुवार दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या पुढील इयत्तेच्या अभ्यासासाठी रोटरी स्कूलचे विद्यार्थी शाळेत दाखल झाले. शालेय शिक्षण प्रत्येकाच्या जीवनात मोठी भूमिका बजावते. ज्ञान, कौशल्य, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व सुधारते. नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या पुढील इयत्तेच्या अभ्यासासाठी रोटरी स्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे फुलांचा वर्षाव व औक्षण करून अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रशालेतील शिक्षिका सौ. भक्ती करंबेळकर व डॉ. गौरव आंब्रे यांनी सर्व विद्यार्थ्यांना पालकांचे व शिक्षकांचे महत्त्व, शिस्त, चांगल्या सवयी, बोधकथा सांगून मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना लघुचित्रपट दाखविण्यात आला. वर्गशिक्षकांनी शाळा सजावट व वर्गसजावट करून विद्यार्थी वर्गखोलीमध्ये प्रवेश करत असतानाच विविध रंगांनी रंगलेले हातांचे ठसे व बोटांचे ठसे कार्डशीट पेपरवर उमटवून घेतले. तसेच विद्यार्थ्यांना बॅचेस, पेन, पेन्सिल, शुभेच्छापत्रे व खाऊ देऊन त्यांचे स्वागत केले. सर्व विद्यार्थी शिक्षणामध्ये रममाण होऊन आनंदमय वातावरणात शिक्षण घेत असल्याने पालक वर्गामधून समाधान व्यक्त होत आहे. संस्थेचे चेअरमन मा. बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg