कणकवली(प्रतिनिधी)- राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस दि 6 ते 11 एप्रिल या कालावधीत भव्य दिव्य कार्यक्रमाने साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे खासदार म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने त्याचप्रमाणे नारायण राणे हे अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांत क्रीडा महाकुंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा महाकुंभ सोहळ्याअंतर्गत विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येक तालुक्यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. कणकवली येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत बोलत होते. यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी, भाजपचे कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, देवगड पडेल मंडळ अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, सुधीर नकाशे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, खासदार राणे यांचे स्वीय सहाय्यक संदीप भोसले, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.
क्रीडा महाकुंभ सोहळ्याअंतर्गत दोन्ही जिल्ह्यांतील क्रीडा चळवळीला चालना मिळेल, असा विश्वास प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला. क्रीडा महाकुंभ सोहळ्या अंतर्गत रविवार 6 एप्रिल रोजी सावंतवाडी तालुक्यात सावंतवाडी तलावाच्या शेजारी मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. सोमवार 7 एप्रिल रोजी वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुल कॅम्प येथे हॉलिबॉल स्पर्धा होणार आहे. मंगळवार 8 एप्रिल रोजी वैभववाडी तालुक्यात दुर्गामाता पटांगणावर रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. याच दिवशी कणकवली तालुक्यातील नगरपंचायतीच्या क्रीडा संकुलात बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. बुधवार 9 एप्रिल रोजी दोडामार्ग तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा येथे कबड्डी स्पर्धा होणार आहे. गुरुवार 10 एप्रिल रोजी देवगड तालुक्यातील देवगड-जामसंडे येथे सायक्लोथॉन स्पर्धा होणार आहे. यात दिवशी मालवण तालुक्यातील देऊळवाडा ते कोंबळब्रिज याठिकाणी सायक्लोथॉन स्पर्धा होणार आहे. कुडाळ तालुक्यातील वासुदेवनंद हॉल येथे जिल्हास्तरीय कॅरम व बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे. कणकवली तालुक्यातील स्पर्धांची जबाबदारी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर, अण्णा कोदे यांच्यावर सोपवली आहे. देवगड तालुक्यातील स्पर्धांची जबाबदारी संदीप साटम, संतोष किंजवडेकर, राजू शेट्ये, बंड्या नारकर यांच्याकडे सोपवली आहे. वैभववाडी तालुक्यातील स्पर्धांची जबाबदारी रितेश सुतार, प्रदीप रावराणे यांच्यावर सोपवली आहे. मालवण तालुक्यातील स्पर्धांची जबाबदारी बाबा परब, धोंडी चिंदरकर, बाबा मोंडकर, ललित चव्हाण यांच्यावर सोपवली आहे. कुडाळ तालुक्यातील स्पर्धांची जबाबदारी रुपेश कानडे, संजय वेंगुर्लेकर, भाई सावंत यांच्यावर सोपवली आहे. सावंतवाडी तालुक्यातील स्पर्धांची जबाबदारी महेश धुरी, रवींद्र मडगावकर यांच्यावर सोपवली आहे. दोडामार्ग तालुक्यातील स्पर्धांची जबाबदारी सुधीर दळवी, चेतन चव्हाण यांच्यावर सोपवली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील स्पर्धांची जबाबदारी बाळू देसाई, सुहास गवंडळकर यांच्यावर सोपवली आहे, असे सावंत यांनी सांगितले.
गुरूवार 10 एप्रिलला संगमेश्वर तालुक्यात देवरुख येथील काजीवरा मैदानावर रत्नसिंधु महा केसरी भव्य खुली बैलगाडा शर्यत स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेची जबाबदारी राजेश सावंत, बाबू कदम, गणेश मोहिते, निलेश देसाई, मिलिंद जंगम यांच्यावर सोपवली आहे. शुक्रवार 11 एप्रिल रोजी राजापूर तालुक्यातील राजापूर तालुका हायस्कूल येथे हॉलिबॉल स्पर्धा आयोजित केली आहे. सायंकाळी 6 ते 10 यावेळेत राजापूर येथील हायस्कूल मैदानावर महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेची जबाबदारी सुयोगा जठार, श्रृती ताम्हणकर, स्नेहा रहाटे यांच्यावर सोपवली आहे. दोन्ही जिल्ह्यांमध्ये होणार्या विविध स्पर्धांमध्ये खेळाडूंनी सहभागी व्हावे. तसेच या स्पर्धां पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभाकर सावंत यांनी केले. खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून 10 एप्रिल रोजी दोन्ही जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजने केली जाणार आहेत. 10 एप्रिल देवरूख येथील मराठा भवन येथे सकाळी 10 ते दुपारी 12 यावेळेत नारायण राणे हे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणार आहे. ओरोस येथील शरद कृषी भवन येथे सायंकाळी 6 वा. नारायण राणे हे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारणार आहे. याच कार्यक्रमात विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक दिली जाणार आहेत. असे प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.