loader
Breaking News
Breaking News
Foto

शाळा वाटद कवठेवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर; तज्ज्ञ डॉक्टर करणार तपासणी ---

रत्नागिरी-खंडाळा(जमीर खलफे)- रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेचा 67 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने ग्रुप ग्रामपंचायत वाटद मिरवणे, साधना फाउंडेशन मुंबई, प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद यांच्या विशेष सहकार्याने आणि शाळा विकास समिती व शालेय व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने रविवार (6 एप्रिल) भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी 9 वाजता जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी येथे होणार असून, यात रत्नागिरीतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शिबिरात कर्करोग तज्ज्ञ (कॅन्सर), नेत्र रोग तज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ (हार्टचे आजार), त्वचारोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ (हाडांचे आजार), पॅथॉलॉजी, स्त्रीरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन्स, बालरोग तज्ज्ञ, मेमोग्राफी, दंत चिकित्सक, इसीजी, कान, नाक, घसा रोग तज्ज्ञ, PAP-Smear , मानसोपचार तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये विविध आजरांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. तब्बल 5 लाखापर्यंतच्या शस्त्रक्रिया व उपचार मोफत असणार आहे. वाटद कवठेवाडी शाळेच्या 67 व्या वर्धापन दिनाच्या औचित्याने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी अप्पा धनावडे (9420052553), अमित वाडकर (9665488144), विलास बारगुडे (7038518678), रमेश तांबटकर (8698525894), प्रभाकर धोपट (8149237279), सौ.सुजाता लोहार (7083244763), माधव अंकलगे (9021785874), श्रीमती राधा नारायणकर (8850358838) यांच्याशी संपर्क साधावा.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg