रत्नागिरी- जवानांमधील सहनशक्ती, दृढनिश्चय, सौहार्द आणि शारीरिक तंदुरुस्ती या गुणांचे प्रदर्शन घडविणार्या तटरक्षक दलाच्या पश्चिम क्षेत्राची आंतरक्षेत्रीय क्रॉस कंट्री चॅम्पियनशिप 2025 ही धावण्याची स्पर्धा भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीने 03 एप्रिल 25 रोजी रत्नागिरी येथे आयोजित केली. पश्चिम क्षेत्राची कार्य सीमा असणारे दमण, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ हे राज्य आणि केंद्र शासित प्रदेश येथील विविध तटरक्षक दलाच्या कार्यालांचे प्रतिनिधीत्व करणार्या 36 स्पर्धकांसह एकूण 06 संघांनी धावण्याची क्षमता आणि लवचिकता दाखवत या रोमांचक स्पर्धेत सहभाग नोंदवला.
तटरक्षक महाराष्ट्राचे कमांडर उपमहानिरीक्षक सुधाकर पाटील यांनी सकाळी साडेसहा वाजता भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीच्या प्रांगणातून चॅम्पियनशिपला हिरवा झेंडा दाखवला. रत्नागिरी शहरामधुन जाणारा एकूण 10 किमी अंतराचा मार्ग या स्पर्धेसाठी आखण्यात आला होता. सांघिक गटात भारतीय तटरक्षक वायु अवस्थान दमण तर वैयक्तिक गटात भारतीय तटरक्षक वायु अवस्थान दमणचे केतन मंगेला, ईएफ हे विजेते ठरले. भारतीय तटरक्षक अवस्थान रत्नागिरीचे कमान अधिकारी समादेशक (क श्रे) दिनेश टामटा तसेच इतर उपस्थित अधिकार्यांनी सहभागींचे त्यांच्या प्रयत्नांबद्दल कौतुक केले आणि कार्य तत्परतेच्या दृष्टीने शारीरिक तंदुरुस्तीच्या महत्त्वावर जोर दिला. कार्यक्रमाची सांगता बक्षीस वितरण समारंभ आणि प्रमुख पाहुणे उपमहानिरीक्षक सुधाकर पाटील यांच्या सर्व स्पर्धकांना दिलेल्या प्रोत्साहनपर शब्दांनी झाली. असे खेळ मानसिक ताण नष्ट करून, अपयशातून मार्ग शोधणे, नव-नवीन गोष्टी आत्मसात करणे यांसाठी प्रेरणा देऊन व्यक्तीला विधायक छंद जोपसण्यासाठी पूरक ठरतात तसेच त्यांतून जवानांमध्ये कोणत्याही मोहिमांसाठी आवश्यक दृढनिश्चय, संघभावना, कठीण परिस्थितीवर मात करून विजय मिळविण्याचा ध्येयवाद हे गुण निर्माण होतात. भारतीय तटरक्षक दल हे स्पर्धात्मक भावना आणि सामान्य लोकांमध्ये फिटनेसबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि तरुणांना सशस्त्र दलात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन नियमितपणे करते असे त्यांनी प्रतिपादन केले.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.