रत्नागिरी - लायन्स क्लब, रत्नागिरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शॉपींग ऍन्ड फूड फेस्टीवल’चा शुभारंभ आज मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत शानदारपणे संपन्न झाला. हा ‘शॉपींग ऍन्ड फूड फेस्टीवल’ जयेश मंगल कार्यालय, माळनाका, रत्नागिरी येथे दि. 5 एप्रिल 2025 पर्यंत सुरु राहील. या फेस्टीवलचा सर्वांनी आवर्जुन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या ‘शॉपींग ऍन्ड फूड फेस्टीवल’मध्ये खरेदी, मनोरंजन व चमचमीत खाद्यपदार्थ यांची रेलचेल असेल. रत्नागिरीतील लायन्स क्लबने आयोजित केलेल्या या ‘शॉपींग ऍन्ड फूड फेस्टीवल’चा शुभारंभ बुध. दि.2 एप्रिल 2025 रोजी रत्नागिरी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, दै. ‘रत्नागिरी टाइम्स’च्या संचालिका सौ. उर्मिलाताई घोसाळकर तसेच लायन्स क्लब, रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. गणेश धुरी, खजिनदार श्री. अमेय वीरकर, सचिव श्री. विशाल ढोकळे, शॉपींग बझचे अध्यक्ष श्री. ओंकार फडके आदी मान्यवर उपस्थित होते.
हा ‘शॉपींग ऍन्ड फूड फेस्टीवल’ रत्नागिरीतील जयेश मंगल कार्यालय येथे शनि. दि. 5 एप्रिल 2025 पर्यंत सुरु राहील. या फेस्टीवलची वेळ सकाळी 10 ते रात्री 10 अशी आहे. यामध्ये आकर्षक कपडे, नावीन्यपूर्ण दागिने, अप्रतिम हस्तकलेच्या वस्तू तसेच चमचमीत खाद्यपदार्थ उपलब्ध असतील. या चार दिवसात चोखंदळ रत्नागिरीकरांना खरेदी व आनंदाचा अनोखा अनुभव घेता येईल. स्थानिक व्यवसायांना चालना देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे श्री. गणेश धुरी यांनी सांगितले. याबाबत बोलताना लायन्स क्लबच्या पदाधिकार्यांनी सांगितले की, या ‘शॉपींग ऍन्ड फूड फेस्टीवल’मध्ये चोखंदळ रत्नागिरीकरांना विविध आकर्षक वस्तू, अत्याधुनिक डिझाईनचे दागिने, चविष्ट खाद्यपदार्थ आणि विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. खवय्यांसाठी चविष्ट खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स हे या फेस्टीवलचे मुख्य आकर्षण आहे. पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थांपासून ते फास्ट फूडपर्यंत सर्व काही उपलब्ध असेल. तरी रत्नागिरीकरांनी या ‘शॉपींग ऍन्ड फूड फेस्टीवल’चा आवर्जुन लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक उद्योजकांना त्यांचे उत्पादन आणि सेवा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची संधी या फेस्टीवलमुळे मिळेल. विशेषत: हस्तकला वस्तू, नाविन्यपूर्ण दागिने, लेस्टेस्ट डिझाईनचे कपडे व चमचमीत खाद्यपदार्थ हे सर्व ग्राहकांच्या निश्चितच पसंतीला उतरेल असे मत यावेळी लायन्स क्लब, रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. गणेश धुरी यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, या उपक्रमातून मिळणारा निधी लायन्स क्लबच्या विविध सामाजिक कार्यांसाठी वापरला जाणार आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.