loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबा, काजू हंगामी पिकांवर परिणाम; पंचनामा करून भरपाई जाहीर करा - अरविंद मोंडकर ---

मालवण (प्रतिनिधी)- अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलामुळे आंबा, काजू हंगामी पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे याचा तत्काळ पंचनामा करून भरपाई जाहीर करा अशी मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे पत्राद्वारे केली आहे. झाडावर येणारा मोहोर काही प्रमाणात खराब झाल्याने कोट्यावधीचा फटका आंबा, काजू बागायतदारांना झाला आहे. परिणामी नवीन पालवी फुटल्याचे देखील निदर्शनास येत आहे. मालवण, देवगड, वेंगुर्ला अनेक ठिकाणी झाड पिकांचा मोहोर काळा पडून काही ठिकाणी त्यावर तयार झालेले फळ गळून पडल्याचे दिसून आले आहे. हाताशी आलेले पीक अशा नैसर्गिक बदलामुळे मातीमोल होत आहे. वारंवार होणारे नुकसान हे जिल्ह्यातील या बागायतदार, शेतकरी वर्गास परवडणार नाही. झाडांना योग्य फळ लागावे म्हणून घेण्यात येणारी मेहनत, लागणारी आर्थिक तडजोड, खत, पाणी फवारणीसाठी लागणारे शारीरिक कष्ट, मजुरी यासाठी काढलेली कर्जे यांसारख्या बाबी ताळमेळ पाहता बागायतदार शेतकरी यांना हे परवडणारे नाही. म्हणून लवकरात लवकर याचे तलाठ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश द्यावेत व पहाणी करून तत्काळ अहवाल बनवून येत्या पावसाळ्यापूर्वीच शेतकर्‍यांना, बागायतदारांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही श्री. मोंडकर यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg