loader
Breaking News
Breaking News
Foto

लंडनहून मुंबईला येणार्‍या विमानाचं तुर्कीत लँडिंग

तुर्की: लंडन-मुंबई व्हर्जिन अटलांटिक विमानामधील 250 हून अधिक प्रवासी तुर्कीच्या दियारबाकिर विमानतळावर अडकून पडले आहेत. 40 तासांपेक्षा जास्त काळापासून अडकलेल्या या प्रवाशांमध्ये बरेचसे भारतीय नागरिक देखील आहेत. दरम्यान या एरलाइन्सच्या प्रवक्त्याने या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की, 2 एप्रिल रोजी लंडनहून मुंबईला जाणार्‍या विमानचा तातडीच्या वैद्यकीय कारणामुळे दियारबाकिर विमानतळाकडे मार्ग बदलण्यात आला. तसेच या विमानाचे लँडिंग झाल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड आढळल्याने त्याची तपासणी सुरू आहे. प्रवाशांना होत असलेल्या गैरसौयीबद्दलही विमान कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. आमच्या ग्राहकांचे आणि कर्मचार्‍यांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि आम्ही झालेल्या गैरसोयीबद्दल मनापासून क्षमा मागतो. आवश्यक असलेल्या तांत्रिक परवानगी मिळाल्यानंतर आम्ही शुक्रवार 4 एप्रिल रोजी स्थानिक वेळ 12.00 वाजता दियारबाकिर विमानतळावरून मुंबईला जाणारे विमान पुन्हा सुरू करेल, असे व्हर्जिन अटलांटिकच्या प्रवक्त्याने सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg