मुंबई :- फटाक्याची वात लावायची आणि पळून जायचं हे भाजपाचं धोरण आहे. फटाका फुटला की यायचं आणि सांगायचं वात आम्हीच लावली होती. पण वात लावल्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपला केला आहे. तसंच वक्फ विधेयक जमिनींवर डोळा ठेवून आणण्यात आलं आहे असाही आरोपही त्यांनी केला. वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात लोकसभेत शिवसेना उबाठाने मतदान केले. या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरेंनी गुरूवारी दुपारी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. उध्दव ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केली. जमिनी बळकावून व्यापारी मित्रांना जे देणार आहेत त्यालाही आम्ही विरोध केला आहे. जिनांनाही लाज वाटली असेल अशी भाषणं करण्यात आली. जिनांनी जे केलं नाही ते भाजपाचे नेते आणि त्यांचे सहकारी पक्ष यांनी करुन दाखवलं. जर ते आम्हाला हिंदुत्व सोडलं म्हणत आहेत तर मग बुधवारी भाजपाने काय सोडलं होतं? जे तुम्ही करत होतात ते लांगुलचालनच होतं. कारण तुम्हाला समोर निवडणूक दिसते आहे. फोडा आणि राज्य करा ही भाजपाची नीती आहे. मला हे सांगा या बिलाचा हिंदुत्वाशी काय संबंध आहे? असा सवालही उध्दव ठाकरेंनी केला. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांचाही खरपूस समाचार ठाकरेंनी घेतला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे काही आम्हाला विचारत आहेत, माझा त्यांना सवाल आहे की ते अटलबिहारी वाजपेयींच्या विचारांवर चालणार आहेत की मोहम्मद अली जिना आणि नवाज शरीफ यांच्या विचारांवर चालणार आहेत? जी भाषणं लोकसभेत झाली ती जिना यांना लाजवणारी होती. शिवाय बाळासाहेबांचे विचार वगैरे सांगू नका. तुम्ही लहान असाल तेव्हा..बाळासाहेब ठाकरेंनी इस्तेमासाठी मिु्स्लम बांधवांना जागा दिली होती. ती तुमच्या सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाला दिली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्हाला शिकवू नका. तुम्ही तेव्हा बच्चे होतात. असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.