loader
Breaking News
Breaking News
Foto

अवकाळी पावसाचा इशारा, कोकणात ऑरेंज अलर्ट

मुंबई - राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिणेकडून पुढे सरकणार्‍या वार्‍यांमुळे महाराष्ट्रात वादळी वारे, अवकाळी पाऊस आणि गारपिटीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. शुक्रवारपासून 6 एप्रिलपर्यंत विजांचा कडकडाटासह वादळी वारे आणि गारपिट, तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल, असा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागामध्ये वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट जास्त असून, या भागात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात काही भागांत ‘यलो आणि ऑरेंज’ अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाचा केळी, द्राक्ष, कांदा पपई, गहू, मका, आदी पिकांना फटका बसला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, कोकणातही पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे आंबा, काजू तसेच कोकम पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून यलो अलर्ट जारी केला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg