loader
Breaking News
Breaking News
Foto

भारत महाविध्वंसक भूकंपाच्या उंबरठ्यावर; धोक्याचा इशारा

नवी दिल्ली :- भारताच्या नजीक असलेल्या म्यानमारमध्ये 28 मार्चला झालेल्या भूकंपामुळे हाहाकार माजला आहे. म्यानमारला बसलेले भूकंपाचे 2 प्रमुख धक्के इतके प्रचंड तीव्रतेचे होते की 8 दिवस झाले तरीही अजूनही नेमके किती लोकं मृत्यू पावले आहेत आणि किती हानी झाली आहे याचा अंदाज बांधता येत नाही. दरम्यान या हाहाकाराच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशातही अशाच प्रकारचा महाविध्वंसक भूकंप लवकरच होऊ शकतो असा इशारा कानपूर आयआयटीच्या वरिष्ठ शास्त्रज्ञाने दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

म्यानमारमध्ये शुक्रवारी (28 मार्च) 7.7 आणि 6.4 रिश्टर स्केलचे दोन भयानक भूकंप झाले. या भूकंपांमुळे म्यानमारमध्ये प्रचंड विध्वंस झाला, ज्यात आतापर्यंत 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत. म्यानमारमधील या भूकंपाचा धक्का शेजारील देश थायलंडलाही बसला आहे. दरम्यान, आता भारतातही म्यानमारसारखा भूकंप येण्याचा इशारा तज्ञाने दिला आहे. आयआयटी कानपूरच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे प्राध्यापक जावेद मलिक म्हणाले की, म्यानमार आणि बँकॉकमध्ये झालेल्या भीषण भूकंपाचे मूळ कारण सागिंग फॉल्ट आहे. सागिंग फॉल्ट अतिशय धोकादायक असून, नकाशाद्वारे हा फॉल्ट सहज पाहता येतो. शास्त्रज्ञ मलिक यांनी सांगितले की, भारतात कोणत्याही मोठ्या भूकंपाची आपण वाट पाहू नये. हिमालयात अनेक सक्रिय फॉल्ट लाइन्स आहेत. अशा परिस्थितीत या क्षेत्रांमध्ये प्रचंड संशोधनाची गरज आहे. याशिवाय या भागात जास्तीत जास्त सावधगिरी बाळगून भूकंपाचा प्रभाव कमी करण्याचे काम करण्यात यावे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg