नवी दिल्ली - लोकसभेत मध्यरात्री उशीरा वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करून घेण्यात सत्तारूढ भाजपला यश आले असले तरी मतदानाच्यावेळी एनडीएचे (भाजपा नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी) पाठबळ घटल्याचे दिसून आल्याने मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा वाजल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. एनडीएकडे 293 खासदार असताना आणि व्हीप बजावला असतानाही केवळ 288 च खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याने सारे काही आलबेल नाही, हे स्पष्टपणे पुढे आल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान वक्फ विधेयकाच्या बाजूने 288 सदस्यांनी मतदान केले. तर विरोधात 232 मते पडली. वक्फ सुधारणा विधेयकावरून एनडीएमध्ये सारे काही आलबेल नाही हेच पुन्हा एकदा दिसले. तेलगु देसम पार्टी आणि जनता दल (युनायटेड) या दोन प्रमुख पक्षांच्या पाठींब्यावर केंद्रात मोदी सरकार आहे. अन्य काही घटक पक्षांचाही मोदी सरकारला पाठींबा आहे. यातील अनेक पक्षांचे वक्फ सुधारणा विधेयकाबाबत मतभेद होते. ते दूर करण्याचे प्रयत्न अमित शाहांनी केले. तब्बल 12 तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर लोकसभेत या बिलावर मतदान घेण्यात आले.
एनडीएने लोकसभेत व्हीप जारी केला होता. सर्व सदस्यांना उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले होते. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित नव्हते. उर्वरीत एनडीएचे सर्व सदस्य आणि खासदार सभागृहात हजर होते. एनडीएकडे 293 खासदार एनडीएच्या खासदारांची संख्या 293 इतकी आहे. याचा अर्थ विधेयकाच्या बाजूने कमीत कमी 293 मते पडणे अपेक्षित होते. एनडीएचे सर्व खासदार चर्चेच्या वेळेपासूनच सभागृहात उपस्थित होते. ज्यांच्या पाठींब्याबाबत शंका व्यक्त होत होती त्या टीडीपी आणि जनता दल युनायटेड या दोन्ही पक्षांनी चर्चेत सहभागी होत विधेयकाचे जोरदार समर्थन केले. मात्र असे असूनही 5 मते कमी पडली. ही 5 मते कोणाची याची चर्चा आता सुरू झाली आहे. एनडीएचे संख्याबळ एनडीएकडे 293 खासदारांचा पाठींबा आहे. त्यामध्ये भाजपचे 240, तेलगु देसमचे 18, जनता दल युनायटेडचे 12, शिंदेंच्या शिवसेनेचे 7, रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांच्या पक्षाचे 5 असे प्रमुख सदस्य आहेत. याव्यतिरिक्त अन्य छोट्याछोट्या पक्षांचे एकूण 13 खासदार एनडीएमध्ये आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेशमधील अपना दलाचे 2, राष्ट्रीय लोकदलाचे 2, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा 1, हम पक्षाचा 1 असे एकूण 13 वेगवेगळ्या पक्षांचे खासदार एनडीएमध्ये आहेत.
प्रत्यक्षात 288 जणांचे मतदान असे असतानाही विधेयकाच्या बाजूने 293 नव्हे तर 288 मते पडली. याचा अर्थ 5 मते कमी पडली. त्यामध्ये 1 मोदींचे मत धरले तरी एनडीएतील अन्य 4 खासदारांची मते कुठे गेली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. व्हीप जारी करण्यात आला असूनही पंतप्रधानांसह आघाडीतील 4 खासदार मतदान प्रक्रियेत सहभागी झाले नव्हते, ही भारतीय जनता पक्षासाठी आणि मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा असल्याचे मानले जाते.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.