loader
Breaking News
Breaking News
Foto

भल्या सकाळी रत्नागिरीत कार व एसटी बसचा अपघात, तरूण ठार

रत्नागिरी :- शहरानजिकच्या कारवांचिवाडी परिसरात एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वस्ती फायनान्स कंपनीची कार घेऊन 5 कर्मचारी चेंबूर(मुंबई) ते रत्नागिरी असे निघाले होते. सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची कार कारवांचीवाडी फाटा येथे आली असता समोरून येणार्‍या एसटी बसला कारची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा जागीच मृत्यू ओढवला. विकास नवसरे (वय 34, रा. मुंबई) असे मृत्यू पावलेल्या या तरूणाचे नाव असल्याचे पोलीसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू ओढवला. अपघाताविषयी पोलीसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, विकास नवसरे हा ड्रायव्हर सीटच्या मागे बसला होता. तो स्वस्ती फायनान्सच्या युनिट मॅनेजर या पदावर कार्यरत होता. मध्यरात्री 12 वाजता ते सर्व मुंबईतून रत्नागिरीत यायला निघाले होते. कारवांचिवाडी फाट्यावर असलेले डायव्हर्जन गाडीचालकाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे समोरासमोर ठोकर झाली आणि अपघात झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg