loader
Breaking News
Breaking News
Foto

मध्यरात्री भरवस्तीत घुसला बिबट्या, गावकर्‍यांमध्ये भीती

रत्नागिरी :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खानू गावच्या हद्दीतील महामार्ग लगतच्या एका घराच्या बाहेर असलेल्या तीन कुत्र्यांवर बिबट्याने मध्यरात्री 2 वाजण्याच्या दरम्यान भरवस्तीत येऊन हल्ला केला. एका कुत्र्याला ठार मारून घेऊन गेला. तर दुसर्‍या दोन कुत्र्यांना जखमी केले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये दिसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महामार्गालगत भर वस्तीत बिबट्याने थेट घरासमोरील भागात येऊन अशाप्रकारे केलेल्या हल्ल्यामुळे सध्या या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहावयास मिळत आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गालगत खानू गावच्या हद्दीत सेवानिवृत्त शिक्षक संतोष आयरे यांचे घर असून त्या घराच्या बाहेरच्या बाजूला त्यांचे तीन कुत्रे रात्री बसलेले होते. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास अचानक कुत्र्यांच्या भुंकण्याचा जोरजोरात आवाज येऊ लागल्याने तात्काळ आयरे यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता दोन कुत्रे जखमी अवस्थेत पडलेले होते. तर एका कुत्र्याला बिबट्या घेऊन जात असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी जखमी कुत्र्यांवर तात्काळ उपचार केले व घराच्या बाहेर असणार्‍या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये ही घटना पाहिली असता त्यामध्ये बिबट्या येताना व हल्ला करून कुत्रा घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg