loader
Breaking News
Breaking News
Foto

बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍या 13 बांग्लादेशींना 6 महिने कैदेसह दंड

रत्नागिरी (वार्ताहर): भारतामध्ये अनधिकृत प्रवेश करुन रत्नागिरी तालुक्यातील नाखरे परिसरात एका चिरेखाणीवर काम करणार्‍या 13 बांग्लादेशी नागरिकांना प्रत्येकी 6 महीने कैदेची व 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 5 महिन्यांपूर्वी पोलीसांनी छापा घालून त्यांना पकडले होते. जिल्ह्याच्या मुख्य न्यायदंडाधिकार्‍याच्या न्यायालयात त्या सर्वाच्या विरोधात सुनावणी होऊन निकाल देण्यात आला. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाला 11 नोव्हेंबेर 2024 रोजी एक माहिती मिळाली की पूर्णगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेले बांग्लादेशी नागरिक राहत आहेत. ह्या माहितीच्या आधारे पोलीसांनी छापा घातला असता त्या ठिकाणी खालील नमूद 13 बांग्लादेशी नागरिक मिळून आले. वाहिद रियाज सरदार, रिजऊल हुसेन कारीकर, शरिफुल हौजिअर सरदार, फारूख महमंद जहिरली मुल्ला, हमीद मुसाफा मुल्ला, राजु अहमंद हजरतअली शेख, बाकीबिलाह अमिर हुसेन सरदार, सैदूर रेहमान मुबारक अली, आलमगीर हुसेन हिरा अबदुल कादर दलाल, मोहम्मद शाहेन समद सरदार, मोहम्मद नुरूझामन मोरोल बालायत अली, मोहम्मद नुरहसन जहर सरदार, मोहम्मद लालतू मोंदल किताब अली त्यांच्याकडे अधिक माहिती व तपास केला असता त्यांना भारतीय असल्याबबतचे कुठल्याही प्रकारचे पुरावे सादर करता आले नाहीत. त्यावरून हे सर्व भारतामध्ये अनधिकृत रित्या प्रवेश करून रहात असल्याबबत खात्री झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच आधारे रत्नागिरी पोलीस दलाने पासपोर्ट अधिनियम, परदेशी व्यक्ति अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पूर्णगड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी रत्नदीप साळोखे यांनी केला व गुन्ह्याचे दोषारोप न्यायालयामध्ये सादर केले. याच प्रकरणाची गुरुवार 3 एप्रिल रोजी सुनावणी होऊन रत्नागिरी जिल्ह्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. निखिल गोसावी यांनी 13 आरोपींना प्रत्येकी 6 महीने साधी कैद व 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg