loader
Breaking News
Breaking News
Foto

बागायतदारांना क्युआर कोड देण्यास प्रारंभ

रत्नागिरी:- हापूसमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी जीआय मानांकन घेतलेल्या आंबा बागायतदारांसाठी क्युआर कोड देण्यास सुरुवात केली आहे. महिन्याभरात 65 हजार क्युआर कोडचे वितरण करण्यात आले होते. अस्सल हापूसची ओळख पटवून देणारा हा क्युआर कोड बागायतदारांना उपयुक्त ठरत आहे. मालाच्या दर्जाबरोबरच मार्केटिंगही चांगल्या प्रकारे होत असल्याची माहिती कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे, सचिव मुकुंद जोशी यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या काही वर्षांत परराज्यातील आंबा कोकणचा हापूस म्हणून बाजारात विकला जात होता. त्याला आळा बसण्यासाठी बागायतदारांकडून वारंवार पाठपुरावा केला जात होता. दोन वर्षापूर्वी हापूस नावाने भौगोलिक निर्देशांक (जीआय टॅग) प्राप्त झाल्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यातील आंबा हा हापूस नावाने विकला जाऊ लागला. तसे जीआय सर्टिफिकेटही शेतकर्‍यांना देण्यास सुरुवात झाली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg