loader
Breaking News
Breaking News
Foto

झरीविनायक मंदिराचा 9 रोजी कलशारोहण समारंभ

रत्नागिरी :- रत्नागिरीनजीक भाट्ये येथे झरीविनायक मंंदिराचा जिर्णोध्दार सोहळा आणि श्री देव गणपती व श्री हनुमान यांच्या पुनःप्रतिष्ठापनेचा सोहळा 7 एप्रिलपासून सुरू होत असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत 5 दिवस म्हणजेच 11 एप्रिलपर्यंत हा सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. 9 एप्रिल रोजी सकाळी 10 वा. 29 मिनीटांनी जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्याजी महाराजांच्या यांच्याहस्ते झरीविनायक मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

7 एप्रिल ते 11 एप्रिल असा सलग 5 दिवस हा उत्सव साजरा होणार आहे. 7 एप्रिल ते 11 एप्रिल असे दररोज सकाळच्यावेळी विविध धार्मिक विधी, पुजाअर्चा, हनुमान मूलमंत्र जप, गंगापूजन, गणपतीचा कलशमंडप संस्कार, आदी विविध विधी आणि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच 7 आणि 8 एप्रिलला दु. 1 ते 5 यावेळात भजने सादर होणार आहेत. 9 एप्रिलला कलशारोहण श्री झरीविनायक मंदिराचा कलशारोहण समारंभ 9 एप्रिलला सकाळी 10 वा. 29 मिनीटांनी जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्याजी महाराज यांच्याहस्ते संपन्न होईल. मूर्तीची प्रतिष्ठापना व धार्मिक विधी संपन्न होतील. दु. 1 वा. महाप्रसाद असेल. तर दु. 1.30 ते 5.30 या वेळात भजने सादर होतील. सायंकाळी 7 ते 10 या वेळात प्रसिध्द गायक प्रथमेश लघाटे यांचा अभंग, नाट्यगीत, भावगीत यांनी सजलेला संगीतमय कार्यक्रम साजरा होईल. त्याचप्रमाणे हास्यजत्रेतील प्रसिध्द कलाकार प्रभाकर मोरे व दत्तू मोरे हेदेखील बहारदार सादरीकरण करतील.

टाईम्स स्पेशल

10 एप्रिलला सायंकाळी 6 ते 11 या वेळात होम मिनीस्टर कार्यक्रम होईल. 11 एप्रिलला सकाळी 9.25 वा. श्री देव हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना व सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली आहे. दु. 1 वा. महाप्रसाद होईल. दु. 1.30 ते 5.30 या वेळात भजन आणि सायंकाळी 7 ते 10 या वेळात उत्सव माय मराठीचा हा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg