loader
Breaking News
Breaking News
Foto

परशुराम घाटात कामाला गती गॅबियन वॉलला येतोय आकार

चिपळूणः- मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटातील धोकादायक दरडीच्या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत. या कामांची नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाहणी केली होती. आता या कामाचा वेग वाढवला असून, धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्याचे काम 60 टक्के होत आले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच गॅबियन वॉलच्या पायथ्याचे कामही वेगात सुरू असल्याने ही भिंत आताच आकार घेऊ लागली आहे. महामार्गाचे चौपदरीकरणाची अनेक कामे विविध टप्प्यांवर रखडली आहेत. त्यात परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली आहे. येथे दरडीच्या भागात जागोजागी खडकात व दरडीच्या भागात 8 ड्रिल मशीनच्या माध्यमातून लोखंडी सळ्या घुसवून त्यावर जाळी बसवली जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोनच दिवसांपूर्वी आमदार निलेश राणे यांनी चिपळूण दौर्‍यावर आल्यानंतर ही कामे पूर्णत्वास जाण्यासाठी ठेकेदाराला स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या अधिकार्‍यांशी बोलताना सांगितले. त्यामुळे संबंधित यंत्रणेने परशुराम घाटातील उपाययोजनांसह उड्डाणपुलाच्या कामांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. दोन महिन्यांपूर्वी परशुराम घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबियन वॉल उभारण्याचे कामही वेगात सुरू केले आहे. सुरुवातीला सिमेंट काँक्रिटीकरणाचा पाया तयार करून त्यावर जाळीच्या साहाय्याने दगडी बांधकामाची रचना केली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्यासाठी महाडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. हे काम उपाययोजनांच्या दृष्टीने कितपत फायदेशीर ठरेल याचा अद्याप अंदाज आलेला नाही.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg