loader
Breaking News
Breaking News
Foto

रेल्वेतल्या वडापावमध्ये साबण; स्टॉलला टाळे!

कर्जत- कर्जत रेल्वे स्थानकात वडापाव विक्रेतेच्या वडापावमध्ये साबणाचा तुकडा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान जाब विचारण्यासाठी गेलेल्या तक्रारदार महिलेला स्टॉल धारकानेच उडवाउडवीची भाषा केली असता या महिलेची दखल घेत कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव प्रभाकर गंगावणे यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर तक्रार करताच याची रेल्वे विभागाने तात्काळ दखल घेत स्टॉल बंद करण्याची कारवाई केली आहे. 1 एप्रिल रोजी मुंबई ते कर्जत प्रवास करणार्‍या खोपोली येथील महिला रशिदा घोरी व त्यांच्या दोन मुलांनी खालेल्या वडापाव मध्ये डिटर्जंटयुक्त फेस तोंडात आल्याने ही गंभीर बाब समोर आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कर्जत-रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवरील व्ही.के. जैन टी स्टॉलवरून महिला घोरी यांनी आपल्या मुलांसाठी वडापाव खरेदी केला होता. वडापाव खाल्ल्याने सुरुवातीला मुलांच्या तोंडाला फेस आला आणि पोटात मळमळ होताच, घोरी यांनी मुलाच्या वडापाव या खाद्यपदार्थाची पाहणी केली असता साबणाचा तुकडा सापडून आला. मात्र तक्रारदार महिला याबाबत स्टॉलधारकास जाब विचारण्यास गेले असता स्टॉल धारकाने महिलेसोबत हुज्जत घातली. याही पुढे महिलेने कर्जत स्टेशन उपप्रबंधक कार्यालयात व्ही.के. जैन टी स्टॉल धारकांचा विरोधात तक्रार देत असताना खाद्यपदार्थ विक्रेता धारकाची येथेही मुजोरी दिसून आली होती.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg