महाड : महाड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत 22,610 मतांनी पराभव झाल्यानंतर नाराज झालेल्या स्नेहल माणिकराव जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जगताप कुटुंबीयांनी ताकद आजमावण्यासाठी 8 एप्रिल रोजी महाडमध्ये शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरवले असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवताना विधानसभा निवडणुकीत 22,610 मतांनी पराभव झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराज असलेल्या स्नेहल माणिकराव जगताप यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भाजपाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने व बरोबर असलेले कार्यकर्ते भाजपामध्ये जाण्यास तयार नसल्याने अखेर जगताप कुटुंबीयांनी ‘राष्ट्रवादी पुन्हा’ म्हणत स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला.
मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये स्नेहल माणिकराव जगताप यांनी प्रवेश केला मात्र अचानकपणे झालेल्या प्रवेशामुळे स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील कार्यकर्ते व पदाधिकारी देखील संभ्रमावस्थेत होते. मात्र जगताप कुटुंबियांच्या प्रवेशाची पूर्वकल्पना 194 महाड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्थानिक पदाधिकार्यांना दिली होती असे समजते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा प्रवेश केल्यानंतर जगताप कुटुंबियांबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्ते जाण्यास तयार नाहीत. यामुळे जगताप कुटुंबीय ताकद आजमावण्यासाठी 8 एप्रिल रोजी महाडमध्ये बैठकीचे आयोजन केले असले तरी या निमित्ताने जगताप कुटुंबीय शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.