loader
Breaking News
Breaking News
Foto

फुलवा खामकरने अलिबागेमध्ये सुरू केला होम स्टे!

अलिबाग: मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार आहेत ज्यांनी अभिनयाव्यतिरिक्त स्वत:चे वेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. या व्यवसायांमुळेदेखील हे कलाकार विशेष चर्चेत येतात. महेश मांजरेकर, सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, श्रेया बुगडे, अक्षया देवधर, रेश्मा शिंदे अशी मोठी यादी या कलाकारांची आहे. आता या यादीमध्ये मराठी मनोरंजनविश्वातील आणखी एका कलाकाराचे नाव जोडले गेले असून तिने अलिबागमध्ये होम स्टे हा खास व्यवसाय सुरू केला आहे. ही कलाकार म्हणजे मराठीसह बॉलिवूडमध्ये विविध प्रोजेक्टसाठी नावाजली जाणारी लोकप्रिय नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर होय. निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याची सोय असणारं होम स्टे तिने अलीकडेच सुरू केले. सोशल मीडियावर फोटो शेअर करत या होमस्टेविषयी फुलवाने माहिती दिली. 12 एप्रिलपासून या जागेचा शुभारंभ होणार असल्याची माहितीही या पोस्टमधून देण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेली अनेक वर्षे नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शिका म्हणून कार्यरत असणारी फुलवा मराठी मनोरंजन विश्वातील एक मोठे नाव आहे. आता तिने स्वत:चा व्यवसाय सुरू करत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर सुरू केल्यानंतर चाहत्यांकडूनही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. या व्यवसायाचे नाव ’होमस्टे नागाव’ असे असून याकरता एक स्वतंत्र इन्स्टाग्राम पेजही सुरू करण्यात आले आहे. या पेजवरुनच या व्यवसायाची माहिती देणारी पोस्ट शेअर करण्यात आली. ज्यात होमस्टेचा सुंदर परिसर, नारळाची वाडी, स्विमिंग पूल, होमस्टेची प्रॉपर्टी इ. गोष्टी दिसत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg