loader
Breaking News
Breaking News
Foto

चार मेट्रिक टन गव्हाची चोरी

पनवेलः तळोजा येथील रोहिंजन गावाजवळील अदानी एग्रो लॉजिस्टिक गोदामातून गहूची वाहतूक करणार्या चालकाने तब्बल 4 मेट्रिक टन गहू चोरी केला. चालकाविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रोहिंजन गावाजवळ अदानी एग्रो लॉजिस्टिक पार्क गोदाम आहे. या गोदामामध्ये क्रिएटिव्ह ग्रेन्स ट्रान्सपोर्टेशन या कंपनीकडे गहू वाहतुकीचा ठेका आहे. 24 मार्चला अनिल कुमार हा गोदामामधून 50 किलो वजनाच्या 440 पोती गहू घेऊन निघाला. परंतु अनिल कुमार याने त्याचा ट्रक कामोठे येथील हावरे सोसायटीसमोरील विनोद भगत यांच्या वाहनतळात उभा करुन निघून गेला. ट्रकमधील मालाची तपासणी केल्यावर त्यात 3,950 किलो ग्रॅम गव्हाचा साठा कमी आढळल्याने क्रिएटिव्ह ग्रेन्स कंपनीच्यावतीने व्यवस्थापक रामकुमार यादव यांनी एक लाख 30 हजार रुपये किमतीच्या गव्हाचा अपहार झाल्याची तक्रार तळोजा पोलिसांत नोंदवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg