loader
Breaking News
Breaking News
Foto

अलिबाग तोंडली उत्पादनात केंद्रबिंदू

अलिबाग- भात, नारळ, पांढरा कांदा आणि आंब्यासाठी प्रसिद्ध असलेले अलिबाग तोंडली उत्पादनातही अग्रेसर आहे. या तालुक्यातील अनेक शेतकरी या उत्पन्नातून लखपती झाले आहेत. तोंडली उत्पादनाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे भविष्यात अलिबाग तोंडली उत्पादनाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अलिबाग तालुक्यातील शेतकरी 15 ते 20 वर्षांपूर्वी तोंडली पिकाकडे वळले. सुरुवातीला चरी, खिडकी भागात तिची लागवड करण्यात येत होती. त्यानंतर कुरुळ, वेश्वी, कार्ले, सागाव, खंडाळे, कनकेश्वरफाटा बामणगांव, बेलोशी, चिंचोटी, रामराज, कावाडे परिसरात मळे बहरू लागले. गेल्या या वर्षी या पिकाची 250 हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. दरवर्षी तोंडलीच्या पिकाचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे उत्पादनातही वाढ होऊ लागली आहे. तालुक्यात सुमारे 850 पेक्षा अधिक तोंडली उत्पादक शेतकरी आहेत.

टाईम्स स्पेशल

अलिबाग तालुक्यात तोंडली उत्पादन दरवर्षी वाढू लागले आहे. चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी मोठ्या संख्येने या पिकाकडे वळले आहेत. चांगल्या नफ्यामुळे भविष्यात ही आकडेवारी वाढण्याची शक्यता अधिक आहे. अलिबाग तालुक्यातील तोंडली पिकाची तोडणी सुरू झाली असून वाशी बाजारात पाठवली जात आहे. अलिबाग तालुक्यात अवघ्या 250 हेक्टर क्षेत्रावर तोंडलीची लागवड केली जाते. पांढर्‍या कांद्यापाठोपाठ अलिबागच्या चविष्ट तोंडलीची मुंबई बाजारात मोठी मागणी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg