loader
Breaking News
Breaking News
Foto

जनसुरक्षा विधेयकाविरोधात 22 एप्रिलला राज्यभर निदर्शने

अलिबाग - ‘महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024’ हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून, जनतेच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. त्यामुळे हे विधेयक रद्द करावे, या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार भाकप, माकप, भाकप माले, शेकाप, सकप, लाल निशाण पक्षांसह विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष-संघटनांनी केला आहे. याअंतर्गत 22 एप्रिल रोजी जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यातील सर्व तहसील कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये याठिकाणी निदर्शने करण्याचा निर्णय मुंबईतील भुपेश गुप्ता भवन येथे आयोजित बैठकीत करण्यात आला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी अध्यक्षस्थानी होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बैठकीला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शेतकारी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, भारत जोडो अभियान, कामगार एकता कमिटी, नारी अत्याचार विरोधी मंच आदी पक्ष व संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 या विषयावर सविस्तर चर्चा झाली आणि या विधेयकाला विरोध करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक विरोधी समिती स्थापन करून तातडीने कृती कार्यक्रम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय मेळावे घेऊन या विधेयकाला विरोध का करायचा, याबाबत जनतेपर्यंत माहिती पोहोचवून जनमत तयार करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. तसेच 30 जून रोजी मुंबई येथे सुरू होणार्‍या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विराट मोर्चा काढण्याचाही निर्णय घेण्यात आला. तसेच समाज माध्यमांमधून याबाबत प्रचार-प्रसार करुन, सर्व आमदारांच्या घरावर व कार्यालयावर जाऊन हे विधेयक रद्द करावे म्हणून विधानसभा, विधान परिषदेत भूमिका मांडण्याबाबत दबाव निर्माण करण्याचे निश्चित करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg