loader
Breaking News
Breaking News
Foto

कोट नं.१ शाळेच्या स्वराली नेवरेकरचे जिल्हास्तरीय महावाचन स्पर्धेत सुयश

लांजा - (वार्ताहर) - रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा व शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्यावतीने आयोजित महावाचन उत्सव २०२४ अंतर्गत 'जिल्हास्तरीय पुस्तक वाचन व लेखन' स्पर्धेत लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोट नं.१ ची विद्यार्थिनी कु. स्वराली संदीप नेवरेकर हिने सहावी ते आठवी गटात जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकाविला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. वैदेही रानडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुस्तके भेट देवून कु. स्वराली हिला गौरविण्यात आले. याप्रसंगी जि. प. चे प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, उप शिक्षणाधिकारी संदेश कडव, आर. के. कांबळे, सौ. मांजरेकर आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

कु. स्वराली हिच्या या यशाबद्दल लांजा गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, विस्तार अधिकारी भाग्यश्री हिरवे, सापुचेतळे केंद्रीयप्रमुख स्नेहा किर, मुख्याध्यापिका क्रांती केसरकर, पदवीधर शिक्षक गोविंद केदार, उपशिक्षिका स्नेहल कदम, माधुरी माने, कोट सरपंच निशिगंधा नेवाळकर, उपसरपंच रवींद्र नारकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश कांबळे तसेच सर्व सदस्य, पोलीस पाटील दत्ताराम गोरुले आणि पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg