loader
Breaking News
Breaking News
Foto

कांदळगाव येथील रामेश्वर मंदिरात ६ रोजी रामनवमी उत्सव

मालवण (प्रतिनिधी) : कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरात देव रामेश्वर देवस्थान परिसर देवालये विश्वस्त मंडळातर्फे ६ एप्रिल रोजी रामनवमी उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रविवार ६ रोजी सकाळी ११ वाजता रामजन्मावर कीर्तन, दुपारी १२.३५ वाजता रामजन्म, पालखी प्रदक्षिणा, १ वा. महाप्रसाद, रात्री ९.३० वा. पुराण वाचन, पोथी पूजन, पालखी प्रदक्षिणा, हडी येथील कावले मित्रमंडळातर्फे मर्दानी खेळ, कीर्तन व नंतर न्हिवेवाडी यांचे नाट्यपुष्प सादर होईल. सोमवार, ७रोजी सकाळी ७.३० लळीतोत्सवाने कार्यक्रमाची सांगता होईल. भाविकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन राणे, परब मानकरी, कांदळगाव ग्रामस्थ आणि देव रामेश्वर व परिसर देवालये विश्वस्त मंडळ, कांदळगाव यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg