loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगरपरिषदेने थकीत मालमत्ता व पाणीपट्टी वसुलीसाठी केली तीव्र मोहीम ---

खेड - येथील नगरपरिषद खेड कार्यालयाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये शहरातील १ ते २५ वॉर्डात थकीत मालमत्ता कर धारक व पाणीपट्टी कर धारक यांचेवर मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसूलीसाठी मुख्याधिकारी महादेव बी. रोडगे यांचे आदेशाप्रमाणे वसूलीची मोहिम तीव्र केली आहे. या कारवाईसाठी विशेष पथक प्रमोद ठसाळे, प्रशासकिय अधिकारी नागेश मारुती बोंडले, गंगाधर गायकवाड, उमेश रेपाळ, राजेंद्र तांबे, संदेश मोहिते, परशुराम पाथरे, सुरज शिगवण, आकाश जाधव, सुरज उपावले यांचे पथक कार्यरत करण्यात आले आहे. या पथकांने अद्यापपर्यंत खेड शहरातील १४ मालमत्ता धारकांवर जप्तीची कारवाई तसेच १२० नळ कनेक्शनधारकांवर थकीत पाणीपट्टी न भरल्यामुळे नळ जोडणी तोडण्याची कारवाई केली आहे. सदरची कारवाई सर्व सुट्टीच्या दिवसांसहित चालू राहणार आहे. तरी नागरीकांनी कराचे वसूलीसाठी व पाणीपट्टी वसूलीसाठी त्वरीत कराचा भरणा नगरपरिषद कार्यालयात भरुन सहकार्य करावे व पुढील कटू कारवाई टाळावी असे आवाहन खेड नगरपरिषदेकडून करणेत येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg