संगमेश्वर (सत्यवान विचारे) : संगमेश्वर पासून नऊ किमी अंतरावर असलेल्या अंत्रवली येथे नुकतेच नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धाचे सिटी फ्युचर ग्रुप अंत्रवली च्या वतीने अश्रसिम भाई कडवईकर आणि सहकारी यांनी आयोजन केले होते. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमधे जिल्ह्यातील पन्नासहुन अधिक संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे ओपनींग तालुक्याचे प.स. समितीचे माजी सभापती सुजित उर्फ बंडाशेठ महाडिक यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महाडिक यांच्या सोबत, हनिफ शेठ वलेले - ग्रामपंचायत सदस्य फणसवणे, मजीद भाई नेवरेकर - राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष, सचिन कामेरकर - बीट हवालदार संगमेश्वर, अनंत उर्फ आप्पा साहेब सुर्वे - माजी सैनिक अंत्रवली, अंत्रवलीच्या विद्यमान सरपंच - सौ - सुर्वे मॅडम, बबन हाजु, कृष्णा मालप, आदि मान्यवर उपस्थितीत होते. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमधील प्रथम विजेता संघ फैसल फायटर अंत्रवली ठरला. तर व्दितीय क्रमांकावर जय हनुमान भंडारवाडी आंबेड संघाने द्वितीय पदावर आपले नावं कोरले.
या स्पर्धेसाठी आयोजकानी प्रथम पारितोषिक - 9999/- व आकर्षक चषक , द्वितीय पारितोषिक 5555/- व आकर्षक चषक, उत्कृष्ट फलंदाज - सन्मान चिन्ह, उत्कृष्ट गोलंदाज - सन्मान चिन्ह, सामनावीर - सन्मान चिन्ह, मान्यवारांच्या हस्तदेऊन गौरविण्यात आले. त्याचवेळी या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व संघांचा आणि उपस्थित मान्यवारांचा देखील उत्कृष्ट सन्मान चिन्ह देऊन गौरवकरण्यात आला. या स्पर्धा पार पडण्यासाठी आयोजक, अश्रसीम भाई कडवईकर यांच्या सोबत लियाकत भाई नेवरेकर, मुराद भाई कडवईकर, इम्तियाज भाई नेवरेकर, अख्तर भाई साटविलकर, सौद कडवईकर, रझी दलवाई, मोहसीन हाजू आदिनी विशेष योगदान दिले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे उत्कृष्ठ समलोचन फणसवणे गावचे मिलिंद शिंदे यांनी केल्याने कमेटीतर्फे त्यांचा विशेष सन्मान करणेत आला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.