loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली चॅम्पियन लिगचा क्रिकेट रसिकांच्या उपस्थितीत शानदार शुभारंभ

दापोली (प्रतिनिधी) : दापोली चॅम्पियन लिग या नावाने क्रिकेट स्पर्धेचे दापोली शहरातील सुप्रसिद्ध आझाद मैदानात आयोजन करण्यात आले आहे. या आयोजित केलेल्या दापोली चॅम्पियन लिगच्या मुख्य प्रायोजिका नगरसेविका सौ.साधना बाळासाहेब बोत्रे तर सह प्रायोजक शितल लोढा फाउंडेशन यांच्या प्रमुख सहकार्याने होणार्‍या दापोली चॅम्पियन लिगच्या उद्घाटनाचा दिमाखदार सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित फित कापून, श्रीफळ वाढवून मोठ्या उत्साहात दर्दी क्रिकेट रसिक प्रेमींच्या साक्षीने करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शुक्रवारपासून पुढे दोन दिवस चालणार्‍या या स्पर्धेत ६ टिम असणार आहेत. लीग स्वरूपात मॅचेस असतील. अनेक क्रिकेट प्रेमी, दिलदार व्यक्ती या स्पर्धेसाठी सढळ हस्ते मदत करत आहेत. त्यामुळे दापोलीतील स्टार खेळाडूंचा खेळ पहाण्यासाठी एक नामी संधी दापोलीकरांना मिळाली आहे. साई देसाई, बावा पवार, नवाज फकी, शेखर आग्रे यांचे उत्तम नियोजन तसेच भरपूर बक्षिसे त्याचप्रमाणे क्रीडा प्रेमी दर्दी रसिकांच्या खास मनोरंजनासाठी सेलिब्रिटीसुध्दा उपस्थित राहणार आहेत. अशा या दापोलीकरांसाठी खास पर्वणी ठरणार्‍या या स्पर्धेत ६ टिम असणार आहेत. लीग स्वरूपात मॅचेस असतील.

टाइम्स स्पेशल

यामध्ये अक्षय फाटक, समद चिकटे, ए.बी.जोशी, दानीश डिमडीमकर, शाहवेज नवशेकर, राहूल राठोड, रूपेश पवार हे टिमओनर आहेत. दापोली शहरातील आझाद मैदान येथे आयोजित केलेल्या या उद्घाटन सामना फाटक डेव्हलपर विरूद्ध वेदांशू योद्धा, दानीश डेव्हलपर या दोन टिम दरम्यान खेळवण्यात आला. या स्पर्धचेे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्षा आणि दापोली नगर पंचायतीच्या नगरसेविका साधना बोत्रे, नगरसेवक रवींद्र क्षीरसागर, दापोली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला अध्यक्षा तसेच माजी नगराध्यक्षा विनीता शिगवण, आयोजक शेखर आग्रे, साई देसाई, बावा पवार, नवाज फकीर, मेघा खटावकर, प्रीती जैन, प्रिया पवार, अनिरुद्ध कदम, विराज जोशी, सावेज नवसेकर, अनस रखांगे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg