loader
Breaking News
Breaking News
Foto

जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने लांजा येथे मेहंदी स्पर्धा संपन्न ---

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर)- जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र (रत्नागिरी विभाग) आयोजित जिजाऊ महोत्सव २०२५ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. या संस्थेच्या वतीने महीलांसाठी शिवण काम, मेहंदी डिझाईन, संगणक, इंग्लिश स्पीकींग, ब्युटी पार्लर, भरत काम, इत्यादी कोर्सचे प्रशिक्षण मोफत दिले जात आहे. तसेच आरोग्य विषयक शिबिरे राबवली जात आहेत. या संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी विभागातील लांजा केंद्र येथे आज मेहंदी स्पर्धा पार पडली. स्वप्न तुमचे, ध्यास आमचा! प्रयत्न तुमचे; आधार जिजाऊचा!! या माध्यमातून सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून संस्थेचे काम अव्याहतपणे चालू असुन महीलांसाठी ही संस्था आधारवड बनली आहे अधिक माहितीसाठी योगेश पांचाळ- तालुकाध्यक्ष लांजा ८९९९६६३०७९ मंदार नैकर; तालुकाध्यक्ष रत्नागिरी ८५५४८५३९९९ अँड. महेंद्र मांडवकर; जिल्हाध्यक्ष ९४२३२९२५७५ केदार चव्हाण- सचिव ७२०८६१२२२२ संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg