loader
Breaking News
Breaking News
Foto

पोल्ट्रीत घुसलेल्या बिबट्याला पिंजर्‍यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश ---

वैभववाडी (प्रतिनिधी)- तिथवली येथे कोंबडयांच्या पोल्ट्रीत घुसलेल्या बिबट्याला वनविभागाने मोठया शिताफीने पिंजर्‍यात जेरबंद केले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. गेले काही दिवस तिथवली कोळपे परिसरात बिबट्यांचा हैदोस सुरू असून बिबट्यांकडून शेळ्या, कोंबड्या, पाळीव कुत्रे फस्त केले जात आहेत. दिवसाढवळ्या ग्रामस्थांना वारंवार बिबट्याचे दर्शन घडत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अगदी घरा शेजारी येऊन बिबट्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आठ दिवसापूर्वी तिथवली येथील एका शेतकर्‍याच्या फार्म हाऊस येथे असलेल्या चार शेळ्या, तर अनेक कोंबड्या फस्त केल्या होत्या. शुक्रवारी सकाळी पोल्ट्री मालक नेहमी प्रमाणे पोल्ट्रीत गेले असता त्यांना पोल्ट्रीत बिबट्या घुसलेला दिसला. त्यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली. वन विभागाने याठिकाणी तातडीने येऊन बिबट्याला मोठया शिफासीने पिंजर्‍यात जरबंद केले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वन विभागाने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. तिथवली कोळपे परिसरात बिबटयाच्या मुक्त संचार सुरु असून बिबट्याने आपला मोर्चा थेट मानवी वस्तीत वळवला आहे. घरातील पाळीव कुत्री, मांजरे, कोंबड्या फस्त करीत आहे. काही दिवसापूर्वी कोळपे येथील शेतकर्‍याचे गोठ्यात बांधलेले वासरू बिबट्याने ठार मारले होते. बिबट्याने मानवीवस्तीकडे मोर्चा वळवल्यामुळे ग्रामस्थांना रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणे धोकादायक ठरत आहे. वस्तीत बिबट्या येत असल्यामुळे मानवी जीवितास धोका निर्माण झाला असून वन विभागाने यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg