loader
Breaking News
Breaking News
Foto

आडे येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याला भक्तीभावाने जल्लोषात सुरूवात ---

दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील आडे येथील श्रीराम सेवा मंडळ आडे यांच्या वतीने दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावाने उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने श्रीराम सेवा मंडळ आडे यांच्या वतीने अगदी दरवर्षीच धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, सांस्कृतिक आदी समाजोपयोगी विविध प्रकारच्या भरगच्च असे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसे यावर्षीही श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामध्ये विशेषतः सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम तसेच शनिवारी 5 एप्रिल 2025 रोजी रात्रौ 11 वाजता दत्त सेवक भजन मंडळ पाडले (भंडारवाडा) ता. दापोली बुवा जीवन गुहागरकर विरुद्ध गुरू दत्त प्रासादिक भजन मंडळ मौजे देशमुख कांबळे, महाड, बुवा सुजित देशमुख यांच्या संगित भजनाची डबलबारी, रविवारी 6 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजता श्रीराम जन्मोत्सव व मंदिरात किर्तन, दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजता रथ मिरवणुक व यात्रा, सोमवारी 7 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता श्रीराम मंदिरात महाप्रसाद, मंगळवारी 8 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता लळीताचे किर्तन, रात्रौ 10 वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी केलेल्या बलीदानाच्या इतिहासावर आधारित श्रीराम नाट्यगृह आडे येथे मराठी चित्रपट छावा दाखविण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याचवेळी शैक्षणिक क्षेत्रामध्ये व खेळामध्ये विशेष प्रावीण्य मिळविणा-या आडे पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माच्या स्थानिक व मुंबईतील खेळाडूंचा पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव केला जाणार आहे. गुरुवारी 10 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता आडे पाडले समुद्र किनार्‍यावर बैलगाडी स्पर्धा, सायंकाळी 5 वाजता खुळया गटातील भव्य चौरंगी कबड्डी स्पर्धा, शुक्रवारी 11 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता श्री. सत्यनारायणाची महापुजा, सायंकाळी 4 वाजता श्रीराम महिला मंडळ आडे आयोजित खास महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ तर शनिवारी 12 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता हनुमान जयंतीच्या किर्तनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. अशा प्रकारे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम सेवा मंडळ आडे यांच्या कडून कळविण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg