loader
Breaking News
Breaking News
Foto

मध्यप्रदेशमध्ये घुमणार कणकवलीतील सिंधुगर्जनाचा आवाज---

कणकवली (प्रतिनिधी)- एन. बी. एस चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोल ताशा पथक कणकवली रामनवमी निमित्त मध्यप्रदेश राज्यातील टिकमगढ येथे येत्या 6 एप्रिल रोजी 217 वे वादन करण्यासाठी रवाना झाले आहे. यापुर्वी सिंधुगर्जना पथकाने ओडिशा, दिल्ली, मध्यप्रदेश, गोवा व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आपल्या वादनाने ठसा उमटविला आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोवा, दिल्ली प्रजासत्ताक दिन परेड यांसारख्या कार्यक्रमांमध्ये विशेष आमंत्रित म्हणून सहभागी झाले आहे. सिंधुगर्जना पथकाने गतवर्षी आपल्या नावावर विश्वविक्रमाची नोंद देखील केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करणार्‍या पथकाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सिंधुदुर्गातील 50 स्त्री -पुरुष कलाकारांच्या संचात सिंधुगर्जना पथक मध्यप्रदेश मध्ये जाऊन वादन करणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg